आशासेविकेची मुलगी होणार डॉक्टर

वेळाबाईच्या तेजस्वीची उत्तुंग भरारी

0

विवेक पिदुरकर, शिरपूर: कौटुंबिक परिस्थिती सामान्य; मात्र परिस्थितीचा बाऊ न करता डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले. यासाठी प्रचंड अभ्यास केला. नीटची परीक्षा उत्तीर्ण केली. अन् तिच्या स्वप्नाने यशाचा मार्ग मोकळा झाला. आता तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. ही यशोगाथा आहे, वेळाबाई येथील तेजस्वीची.

वणी तालुक्यातील वेळाबाई येथील तेजस्वी भालचंद्र उमरे हिने नीट परीक्षेत ७२० पैकी ४९८ गुण प्राप्त केले. नुकताच तिचा ‘एमबीबीएस’ला प्रवेश निश्चित झाला. भालचंद्र आणि रेणूताई यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. तेजस्वी ही सर्वांत मोठी मुलगी.

तेजस्वीने १२ वीची परीक्षा चंद्रपूरच्या गर्ल्स कॉलेज मधून ७९ टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. तेजस्वीचे वडील कळमना येथील भास्करराव ताजने विद्यालयात शिपाई आहेत. तर आई आशा स्वयंसेविका आहे. तेजस्वीच्या यशाबद्दल शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनव कोहळे, डॉ. प्रवीण बोडखे यांनी तेजस्वीची आई रेणूताईचा सत्कार केला. यावेळी आरोग्य केंद्रातील आशासेविकांची उपस्थिती होती. 

हेदेखील वाचा

मृत्युनंतरही अनुभवला ‘त्याने’ प्रेमाचा ओलावा

हेदेखील वाचा

महाज्योतीमार्फत जेईई-नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

Leave A Reply

Your email address will not be published.