अभिमानानं शिर उंचावलं लेकीनं जमादार बापाचं आणि आईचं….

पोलीस हेड कॉन्स्टेबलची मुलगी अंकिता नैताम झाली डॉक्टर

0 859

सुशील ओझा, झरी: तुकाराम नैताम पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर मुकूटबन येथे कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या दोन्ही लेकरांमधील बुद्धिमत्ता, जिद्द आणि चिकाटीची पारख होती. त्यांनी दिवसरात्र मेहनत करीत आपल्या मुलगा व मुलीचे भविष्य घडविले. त्यांची मुलगी अंकिता डॉक्टर झाली. तिच्या यशामुळं पालकांचं शिर उंचावलं. तिच्या यशाबद्दल त्यांचे समाजासह नातेवाईक व मित्रा परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

नेहमी अतिदुर्गम अशा आदिवासी भागात समाजा सोबत राहून व समाजाला शैक्षणिक व सामाजिक मार्गदर्शन करीत स्वत:त्या मुलांचेसुद्धा भविष्य घडवण्यात यशस्वी ठरले. नैताम यांनी मारेगाव ठाण्यात पाच वर्षे, पांढरकवडा येथे पाच वर्षे, पाटण येथे ७ वर्षे आणि सध्या मुकुटबन येथे तीन वर्षांपासून ते कार्यरत आहेत. पांढरकवडा सत्र न्यायाल्यात कोर्ट मोहरर म्हणून काम करीत आहे. सन २०१८ मध्ये मुलगा संकेत हा जी मेन्स ही अखिल भारतीय परीक्षा पास झाला. तो सध्या VNIT नागपूर येथे शिक्षण घेत आहे. तसेच त्याला मागील वर्षे पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ कडून एक लाख रूपये योजनेतून प्राप्त झाले होते.

या वर्षी सन २०१९ मध्ये मुलगी कु.अंकिता ही नीट (NEET) या अखिल भारतीय परीक्षेत पास झाली. तिचा नंबर शासकीय मेडिकल कॉलेज जळगाव येथे एमबीबीएस (MBBS) साठी लागला. पोलीस खात्यात कर्त्यव्य बजावत असताना, अतिशय मेहनत घेऊन सर्वांशी हसत बोलत राहून चांगले सबंध जोपासत दोन्ही मुलांचे भविष्य उज्ज्वल केले आहे.

नैताम यांची पत्नी किरण ह्यांचंसुद्धा एम.ए पर्यत शिक्षण झालं आहे. त्या पंचायत समिती पांढरकवडा येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. दोन्ही मुलांचं शिक्षण करून त्यांना या पातळीपर्यत पोहचविण्यात यांचाही मोठा सहभाग आहे.

Comments
Loading...