विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.

0

जोतिबा पोटे, मारेगाव : शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील ३२ वर्षीय विवाहितेने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारच्या मध्यरात्री घडली. सोनू हिरालाल जाट (३२) आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मोल मजुरी करुन आपल्या दोन मुलाचा सांभाळ करीत होती. आत्महत्तेचं कारण अस्पष्ट असून, पती गेल्या चार वर्षांपासून मध्यप्रदेश राज्यात असल्याने आईवडिलांच्या घरासमोर सोनू ही आपल्या दोन अपत्यांचा सांभाळ करून गुजरान करीत होती.

गुरुवारला सकाळीमुली झोपेतून उठताच ही दुर्दैवी बाब उघडकीस आली. मारेगाव पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल केला असून, पो.नि. दिलिप वडगावकर यांचे मार्गदर्शनाखाली जमादार भालचंद्र मांडवकर व अनिल बिनगुले घटनेचा तपास करित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.