तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

आज 14 व्यक्ती पॉजिटिव्ह, रुग्णसंख्या हजारच्या पार

0

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या आकड्याने अचानक झेप घेतली. आज 14 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. यातील 9 व्यक्ती वणी शहरातील तर 5 व्यक्ती ग्रामीण भागातील आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणीतील प्रगतीनगर येथे सर्वाधिक 4 तर रंगनाथ नगर, बन्सल नगर, ढुमे नगर, देशमुखवाडी, रंगारीपुरा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. तर भालर टाऊनशीप येथे 2 व गणेशपूर व चिखलगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला.

शुक्रवारी यवतमाळ येथून 44 रिपोर्ट आलेत. यात 10 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 34 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 21 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 17 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 50 संशयीतांचे स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यवतमाळहून अद्याप 71 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 46 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 1018 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 949 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज एका कोरोनामुक्त व्यक्तीला सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 46 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 22 जण होम आयसोलेट आहेत. सध्या 17 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 07 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 झाली आहे.

हे पण वाचा:

युवा शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरविले ट्रॅक्टर

हे पण वाचा:

उद्या शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.