जंगलात शेळकीची कीटकनाथक प्राशन करून आत्महत्या

मारेगाव तालुक्यातील वरुडच्या जंगलातील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: वरुड (पारधीबेडा) येथील एका शेळकीने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. मृतकाचे नाव विजय सब्बल पवार (वय 44) असे आहे. सकाळी मृतक विजय हा शेळ्या घेऊन परिसरातील जंगलात गेला होता. तिथेच त्याने विषारी औषध प्राशन केले. सकाळी 11 वाजता मृतकाचा भाचा गंगाधर चंद्रशेखर घोसले हा जंगलात शेळ्या चारायला गेला असता ही घटना उघडकीस आली. त्याने याची माहिती नातेवाईकांना दिली. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरानी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास करीत आहे. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहेत.

हे देखील वाचा:

ट्रु केअर पॉलिक्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.