गणेशपूर येथे सुरक्षा गार्डची गळफास घेऊन आत्महत्या

डीलाईट कंपनीतील घटना

1

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील डीलाईट चुना फॅक्टरी मधील सुरक्षा गार्डने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. गजानन ठावरी असे मृतकाचे नाव आहे. वरोरा जवळील सुईत या गावातील तो रहिवाशी होता. कामानिमित्त तो गणेशपूर येथे आला होता.

Podar School 2025

मृतक गजानन ठावरी हा गणेशपूर येथील डीलाईट नामक कंपनीत काम करायचा. तो त्याचा लहाण भाऊ संतोष ठावरीसह कंपनीच्या लेबर कॉर्टरमध्ये राहत होता. सकाळी सकाळी 9.30 वाजता दरम्यान त्याने कॉर्टरच्या बाथरूमध्ये नायलॉनच्या दोरीने फाशी घेतल्याचे आढळून आले. गजाननचा भाऊ संतोष ठावरी व काही कर्मचा-यांनी गजाननला मुकुटबनच्या शासकीय दवाखान्यात दाखल केले. स्टोअर किपर सुनील धरनेवार यांना घटनेची माहिती देण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुनील धरनेवार घटनास्थळी पोहोचले. ते गजाननला घेऊन खासगी कारने वणी येथे निघाले. मात्र वाटेत भावाने आत्महत्या केल्याच्या धक्याने मृतकाचा भाऊ संतोष ठावरी यांची देखील प्रकृती अचानक खराब झाली. सुनील धारनेवार यांनी दोघांनाही कायर येथील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी गजाननची तपासणी केली असता त्याला मृत घोषीत केले. 

गजानन ठावरी व संतोष ठावरी हे दोघे भाऊ होते. ते वरोरा तालुक्यातून नोकरीनिमित्त मुकुटबन येथे आले होते. ते एकत्रच कंपनीतील कोर्टर मध्ये राहत होते. मृतक गजानन यांचे लग्न एक दीड वर्षा पूर्वी झाले होते. सतत आनंदी दिसणा-या सर्वांशी मिळून मिसळून राहणा-या गजाननने असे टोकाचे पाऊल उचलल्याने कर्मचा-यांना धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकऱणाचा पोलीस तपास करीत आहे.

हे देखील वाचा:

सलग दुस-या दिवशी तालुक्यातील रुग्णसंख्या शुन्य

सासुरवाडीला निघालेल्या तरुणावर काळाचा घात

Leave A Reply

Your email address will not be published.