नागेश रायपुरे, मारेगाव: एका इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील बोटोणी येथे आज 7 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. रवी मारोती मिंदेवार (51) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तो घरी एकटे असल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
प्राप्त माहिती नुसार मृतक रवी मारोती मिंदेवार हा शेतकरी असून यांचे कडे 5 एकर शेती होती. तसेच तो अविवाहित होता. त्यातच त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाल्याने तो घरी एकटाच राहायचा. तो आज पहाटे अंदाजे 3 ते 4 वाजता पासून घरून बेपत्ता होता. दरम्यान त्याच्या गावातील आप्त नातलगांनी बेपत्ता असल्याने त्याचा शोधा शोध चालू होता.
दरम्यान बोटोनी पासून काही अंतरावर मृतकाच्या शेताजवळ असलेल्या चुलत भावाच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगत आढळला. मारेगाव पोलीस ठाण्यात घटनेचा मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रवीच्या आत्महत्याचे कारण कळू शकले नाही.
रवीचे आई वडील हयात नव्हते. त्यातच तो अविवाहित होता. त्यामुळे त्याला सर्वच कामे स्वतःच करीत स्वतःचा सांभाळ करावा लागत होता. पॉझिटिव्ह आल्यापासून त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणीच नव्हते. यामुळे त्याने या नैराश्यातून आत्महत्या केली असावी असे गावात बोलले जात आहे.
हे देखील वाचा: