सावर्ला येथे विष पिऊन तर गणेशपूर येथे गळफास लावून आत्महत्या

सततच्या आत्महत्येने तालुक्यात खळबळ

0

विवेक तोटेवार, वणी: सततच्या आत्महत्येने सध्या तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री गणेशपूर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर सावर्ला येथे रविवार संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एका इसमाने विषारी औषध प्राषन करून आपली जीवनयात्रा संपविली.

गणेशपूर येथील रजनीकांत संतोष गेडाम (20) या तरुणाने रविवारी 6 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या स्विच ऑफिसच्या बाहेर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रजनीकांत याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. घटनेचा तपास निखिल फटींग करीत आहे.

तर सावर्ला येथे प्रवीण नामदेव चोपणे (32) या व्यक्तीने रविवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुपणालायत दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रवीणच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे दोन मुली, पत्नी, आईवडील असा आप्तपरिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

शनिवारी तालुक्यातील बाबापूर (कायर) येथील शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर रविवारी दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. सततच्या आत्महत्येमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मारेगाव तालुक्यानंतर आता वणी तालुक्यातही आत्महत्येच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!