लहान पांढरकवडा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना

2

नागेश रायपुरे, मारेगाव: वर्ष भरापासून मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र थांबता थांबेन.आज पुन्हा एका विवाहित इसमाने आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील पांढरकवडा (लहान) येथे आज 20 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. नितीन नागोराव धानोरकर (32) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार नितीन हा खाजगी ड्रायव्हर होता. नितीनचा मृत्यूदेह हा घरच्या एका खोलीत गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होता. मृतकाचे कुटुंब झोपेत असताना पहाटे उठल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नितीनच्या मागे पत्नी, दोन मुले,आई, वडील भाऊ असा मोठा आप्तपरीवार आहे. नितीनच्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.