अवतार 2 हाउसफुल्ल… पब्लिक डिमांडमुळे 3D चे रोज 3 शो

पाहा सुजाता थिएटरमध्ये अद्भुत, अलौकिक, अकल्पनीय अवतार 2 डॉल्बी ऍटमॉस साउंडमध्ये..... बुकमाय शो, पेटीएम मुव्हीसह ऑफलाईन करता येणार बुकिंग. माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 संपर्क

बहुगुणी डेस्क, वणी: नुकतेच वणीतील सुप्रसिद्ध सुजाता थिएटरमध्ये 3D सिनेमा सुरु करण्यात आला आहे. शुक्रवारी अवतार 2 हा सिनेमा सुजाता थिएटरमध्ये लागला असून यात प्रेक्षकांना या सिनेमाचे 3D मधले 2 शो ठेवण्यात आले होते. मात्र पब्लिक डिमांडमुळे आता या सिनेमाचे 3डी मध्ये 3 शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे तर एक शो हा साधारण शो साठी ठेवण्यात आला आहे. 3D शो  दुपारी 11.30, सं. 6.30 व रात्री 10 वा हा शो प्रेक्षकांना 3D मध्ये तर  दु. 3.00 चा शो 2D मध्ये पाहता येणार आहे. सोबतच सुजाता थिएटर हे लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमने सुसज्ज असल्याने प्रेक्षकांना आता सिनेमा बघण्याचा अनुभव आणखी रिअलॅस्टीक होणार आहे.

टायटॅनिक फेम दिग्दर्शक जेम्स कॅमरॉन यांचा 2009 मध्ये अवतार हा सिनेमा रिलिज झाला होता. या सिनेमाने जगभरातील सर्व रेकॉर्ड्स तोडले होते. तब्बल 13 वर्षांनंतर आता या सिनेमाचा दुसरा भाग अवतार – द वे ऑफ वॉटर म्हणजेच अवतार 2 हा भाग रिलिज झाला आहे. लोक या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. हा सिनेमा 3D मध्ये बघता येणार असल्याने सिनेमा हाउसफुल्ल सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी ऍडवास बुकिंग करून तिकीट आधीच बुक करावी व होणारी अडचण टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे.

2009 मध्ये रिलीज झालेल्या अवतार सिनेमात पांडोरा या अद्भूत जगातील चित्रण करण्यात आले होते. पेंडोरा हे नावी राहत असलेले ठिकाण आहे. माणसासारखा दिसणारा, पण माणूस नाही. माणसाला त्यांच्या सुंदर जगात प्रवेश करून मौल्यवान वस्तू मिळवायची असते. ही कथा प्रेक्षकांनी अवतार मध्ये बघितली आहे. अवतार 2 मध्ये यापुढची कथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दुस-या भागात दिग्दर्शक पुन्हा पॅंडोराच्या जगात परत घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहेत. यावेळी आकाशाच्या उंचीवर नव्हे तर खोल समुद्रातील कलाबाजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ज्या प्रेक्षकांना या सिनेमाचा पहिला भाग पाहायचा असेल त्यांना डिस्ने हॉटस्टारवर हिंदीमध्ये पहिला भाग बघता येणार असून त्यांना दुस-या भागाचा सुजाता थिएटरमध्ये आनंद घेता येईल.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.