रोटे. अनिल उत्तरवार यांना मातृशोक

सुरेखा गजानन उत्तरवार यांचे आजाराने निधन

0

जितेंद्र कोठारी, वणी: मुकूटबन येथील सुरेखा गजाननराव उत्तरवार (65) यांचे बुधवार 18 नोव्हें. रोजी निधन झाले. त्या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांचे उपचार सुरू होते. बुधवारी नागपूर येथील घाटरोड मोक्षधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रोटे. अनिल उत्तरवार यांच्या त्या आई होत्या.

सुरेखा ह्या रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीचे माजी अध्यक्ष तसेच उत्तरवार ऑटोमोबाईलचे संचालक अनिल उत्तरवार आणि सुनील कृषी केंद्र मुकूटबनचे संचालक सुनील उत्तरवार यांच्या आई होत्या. माजी मुख्याध्यापक गजानन उत्तरवार यांच्या त्या पत्नी होत्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे. सुरेखा उत्तरवार यांना श्रद्धांजली म्हणून मुकूटबन येथील संपूर्ण बाजारपेठ दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. वणी बहुगुणी तर्फे सुरेखा उत्तरवार यांना विनम्र श्रद्धांजली.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.