प्रहार संघटनेचे मारेगाव ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान
दिवाळीच्या निमित्ताने स्वच्छ करण्यात आला परिसर
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुका प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयाचा परिसर रविवारी सकाळी स्वच्छ करण्यात आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात केर कचरा असून त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. या परिसरात स्वच्छता अभियान वापरून या परिसराची साफसफाई करण्यात आली.
या आधी ही प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबवून सामाजिक आपुलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यातलाच एक भाग म्हणून रुग्णालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचा कार्यक्रम करण्यात आला अशी माहिती प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख मृत्यंजय मोरे यांनी ‘वणी बुहुगुणी’ला दिली.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रहारचे नंदकिशोर चिंचुलकर, रामभाऊ जिड्डिवार, मारोती जोगी, बंडी चौधरी, विठ्ठल गेडाम, शंकर खडसे, अविनाश पेंदोर, राजु जोगी, गोलू कामटकर आणि प्रहारचे कार्यकर्ते कार्यकर्ते सहभागी होते.