भांदेवाडा येथील जगन्नाथ बाबा देवस्थानाला स्वच्छता यंत्र भेट

संजय खाडे यांचे दातृत्व, मंदीर व परिसर स्वच्छ राहण्यास होणार मदत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज देवस्थानाला आज शनिवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी संजय खाडे यांच्या तर्फे दोन ऑटोमॅटीक स्वच्छता यंत्र भेट देण्यात आले. स्वच्छता यंत्रामुळे मंदीर व परिसर स्वच्छ ठेवण्यास चांगली मदत होणार असे मनोगत व्यक्त करीत संस्थेचे अध्यक्ष बबन धानोरकर यांनी संजय खाडे यांचे आभार मानले. संत जगन्नाथ बाबा हे आपल्या परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. इथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. स्वच्छता यंत्रामुळे श्रमाची बचत होणार आहे, असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले. यावेळी पुरुषोत्तम आवारी, प्रा. डॉ. शंकरराव व-हाटे, अध्यक्ष तेजराज बोढे, माजी सरपंच नागोबाजी आवारी, रंगनाथ स्वामी अर्बन निधीचे संचालक ईश्वर खाडे, धनंजय खाडे, रोशन ठाकरे इत्यादी उपस्थित होते.

Comments are closed.