मारेगाव येथे जिल्हा दारूबंदी साठी धरणे आंदोलन

0

मारेगाव: संपूर्ण जिल्हा दारूबंदी व्हावी यासाठी मारेगाव येथे तहसील कार्यालयात समोर सकाळी ११ वाजता पासून एकदिवसिय धरणे आंदोलन झाले. यात स्वामिणी संघटनेद्वारा आयोजित या धरणे आंदोलनात महिलाची संख्या लक्षनिय होती.

गेल्या अनेक वर्षापासून स्वामिणी जिल्हा दारु मुक्त आंदोलन राबवीत असताना अनेक गाव खेड्यात या संदर्भात स्वामिनीच्या वतीने दारूबंदी साठी लोकांना जागृत करण्यात आले. परंतु अनेक आंदोलन झाले असताना जिल्हा दारूबंदी का होत नाही असा प्रश्न महिलांना भेडसावत आहे. उभी बाटली आडवी करण्यासाठी मतदान घेऊन सुद्धा बाटली उभीच राहल्याने लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली तर नाही अशी शंका निर्माण होत आहे.

यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल असताना इथे शेतकरी व मजुरी करणा-यांची संख्या मोठी आहे.  कष्टकर्याच्या श्रमाची कमाई जात असुन हि गरिब कष्टकरी जनतेची लुट होत आहे. ही लूट थांबण्यासाठी स्वामीणी आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा दारूबंदी  करिता जनआंदोलन उभारले. त्यात मारेगाव येथील तहसील कार्यालयात समोर एकदिवसिय धरणे आंदोलनात मारेगाव तालुका स्वामिनीच्या महिला पुरुष व गुरूदेव सेवा मंडळचे कार्यकर्ते  मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी होते.

यावेळी स्वामिनी जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीच्या वतीने मारेगाव तहसीलदार विजय साळवे यांना निवेदन सादर करन्यात आले. या धरणे आंदोलनात स्वामिनी व गुरूदेव सेवा मंडळाचे राजेंद्र मांदांडे, रामभाऊ दरेकर, गौतम उमरे, अरुण खैरे, अनिल राऊत, अमोल गुरनुले, देवा बोबडे, पांडुरंग कालेकर, विजय गोहोकर, विलास नक्षणे, बंडु सुर, सुचिता सोनुले, दुर्गा मोहुर्ले, संगिता सोनुले, सुवर्णा महाडोळे, रंजना मारकंडे, मीना शेंडे, रेखा गाउत्रे, जिजा मेसेकर, लता आदे, विद्या लेनगुळे, सूफला मेश्राम, मंगला महाडोळे, रुख्मा वाटगुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….

Leave A Reply

Your email address will not be published.