झरी तालुक्यातील महादेव शिंदे उत्कृष्ट तलाठी म्हणून सन्मानित

विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या हस्ते पुरस्कृत

0

सुशील ओझा, झरी: महसूल विभागातर्फे दरवर्षी चांगले काम करणारे तलाठी यांची निवड करून उत्कृष्ट तलाठी म्हणून शासनाच्या वतीने गौरवण्यात येते. तलाठी यांना शासन क्षेत्रीय पातळीवर काम करणारे तलाठी यांना नेमून दिलेली कर्त्यव्य पाडणे उदा.तलाठी दप्तर अद्यावत ठेवणे,जनतेशी नेहमी सहकार्याची वागणूक देणे, दैनंदिन कामकाजात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करणे हे किती व कोणते तलाठी करतात याची माहिती घेऊन तलाठ्याची निवड केली जाते.

वरील शासन स्तरावरील दिलेली कर्त्यव्य झरी तालुक्यातील हिवरा बारसा येथी तलाठी महादेव शिंदे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले व त्याचे तंतोतंत पालन सुद्धा करीत आहे.त्यांची निवड अमरावती विभागातून सर्व तल्याठ्यातून उत्कृष्ट तलाठी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालय तर्फे निवड करण्यात आली.

एक ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे महसूल दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात अमरावती विभागातून सर्वोत्तम काम करणारा तलाठी पुरस्कार विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. झरी सारख्या आदिवासीबहुल तथा महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुक्यातील तलाठ्याने विभागातून पुरस्कार घेऊन तालुक्याचे विभागीय स्तरावर नावाचा ठसा उमटवून तालुक्याचे नावलौकिक केले .ज्यामुळे सर्वच स्तरांवरून शिंदे यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.