सुशील ओझा, झरी: बुधवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पिवरडोल येथिल पिवराई माता संस्थान येथे अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाची तालुका कार्यकारिनी गठित करण्यात आली. त्याप्रसंगी यवतमाळ. जिल्हा श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी पद्माकरजी ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रितम सोनवने, अशोकराव भेंडाळे, रमेश पोतराजवार यांच्यासह आजिवन प्रचारक व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रार्थणा गिताने करण्यात आली. पस्थित मान्यवरांनी मनोगत व मार्गदर्शनपर भाषणे दिले. नंतर कार्यकारिणी गठित करण्यात आली. झरी तालुका सर्वाधिकारी म्हणून संतोष उरकुडा शेंडे रा. पिवरडोल व तालुका प्रचारप्रमुख म्हणून प्रविण नामदेव गुरनुले रा. गवारा यांची तर उप सर्वाधिकारी म्हणून पुरुषोत्तम पेटकुले रा. पवनार यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्त झालेल्या पदाधिका-यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
त्याप्रसंगी झरी तालुक्यातील बहुतांश गुरूदेव सेवक उपस्थित होते. पाहुणे म्हणून पिवरडोल येथील सरपंच यादव वाढई, उत्तम भोयर पोलीस पाटील, श्रीधर गुरनुले, भिवसन गुरनुले, उरकुडा शेंडे, कांचन शेंडे, संतोष राऊत, दीपक भेंडाळे,गोविंदा ठाकरे, विठ्ठल गुरनुले, अशोक वाडगुरे, राजु चौधरी, दीपक चौधरी,विठ्ठल महाडोळे, तसेच कारेगाव येथील गोपाळ गुरनुले उपस्थित होते. पद्माकरजी ठाकरे जिल्हा सर्वाधिकारि व मान्यवराचे शाल व श्रीफळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.