बत्राजी की दाबेली रविवारपासून नवीन ठिकाणी

बत्राज स्नॅक्स कॉर्नरचे जैन स्थानक रोड टागोर चौक येथे स्थानांतरण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुप्रसिद्ध दाबेली सेंटर असलेल्या बत्राज स्नॅक्स पॉईंट (बत्राजी की दाबेली) आज रविवारी दिनांक 3 एप्रिलपासून जैन स्थानक रोड टागोर चौक येथे स्थानांतरीत होत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता या नवीन ठिकाणी येऊन दाबेलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बत्रा स्नॅक्स पॉईंटतर्फे करण्यात आले आहे.

गेल्या दोन दशकांपेक्षाही अधिका काळापासून बत्राजीकी दाबेली हे वणीकर खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत आहे. आधी हे दाबेली सेन्टर चिंडालीया कॉम्लेक्स येथे होते. मात्र दिनांक 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हे सेन्टर नवीन ठिकाणी म्हणजे जैन स्थानक रोड टागोर चौक येथे स्थानांतरीत झाले आहे. रविवारापासून हे सेन्टर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सुरू करण्यात आले आहे.

गेल्या 22 वर्षांपासून बत्राज स्नॅक्स कॉर्नर हे शहरात प्रसिद्ध आहे. दाबेली ही मुळची गुजरातचे स्ट्रीट फूड असून याला देशी बर्गर देखील म्हटले जाते. वणीत ही डिश सुरू करण्याचे श्रेय हे बत्राज स्नॅक्स पॉइंटलाच जाते. ग्राहकांनी आजपर्यंत दिलेला प्रतिसाद यापुढेही कायम ठेवावा व दाबेलीचा नवीन ठिकाणी आस्वाद घ्यावा असे आवाहन बत्राज स्नॅक्स पॉइंटचे संचालक मुकेशकुमार बत्रा यांनी केले आहे.

नवीन पत्ता: बत्राज स्नॅक्स कॉर्नर, जैन स्थानक रोड, टागोर चौक वणी
मो. 9970689327

Comments are closed.