विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल कायरमध्ये  शिक्षक दिन साजरा

शाळेत विद्यार्थी बनले शिक्षक

0

संतोष ढुमणे, भालर: वणी तालुक्यातील कायर इथल्या विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन राबवण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं.

स्वयंशासनमध्ये विद्यार्थ्यांनी शाळा चालवली. यात प्राची काळे ही मुख्याध्यापिका बनली होती. नंतर शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये कार्यक्रम अध्यक्ष म्हणून स्वयंशासनाच्या मुख्याध्यापिका प्राची काळे होती, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक बनलेले मुस्कान सय्यद, अनुश्री घुगुल आणि स्वयम वाघाडे  हे होते. कार्यक्रमाचे संचालन जिया  पत्रकार, प्रास्ताविक निकिता बेलेकार व आभार प्रदर्शन आदित्य गारघाटे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला ठावरी, पावडे, कुचनकर, राजूरकर, पानघाटे, गाऊत्रे, जेऊरकर, धोबे, चौधरी या शिक्षकांनी आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.