सुशील ओझा, झरी: शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासंदर्भात विजयुक्ता, झरी तालुका युनिटने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मूल्यांकन प्राप्त घोषित अघोषित उ. मा. शाळा वाढीव तुकड्या आठ अघोशीतला घोषित करून निधी द्यावा यांसह अनेक मागण्या झाल्यात.
1 नोव्हे 2005 पूर्वी अनुदानावर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी. 20 वर्ष विनावेतन कार्यरत आयटी शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे. राज्य सरकारी कर्मच्याऱ्यांप्रमाणे 10, 20, 30 वर्षांची अश्वसित प्रगती योजना लागू करावी. या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
दि. 18 फेब्रुवारी 2020 ला शिक्षणमंत्र्यांसमवेत संघटनेची झालेली बैठकित झालेल्या चर्चेनुसार शिक्षकांच्या समस्या एका महिन्यात निकाली काढण्याचं आश्वासन दिले होते. परंतु वेळोवेळी झालेल्या आंदोलने व निवेदने दिल्या नंतरही शासनाने कोणतेही आदेश न दिल्याने नाइलाजने शिक्षकदिन काळा दिवस म्हणून पाळावा लागला. निवेदन देताना प्रा. देविदास गायकवाड, प्रा. प्रवीण उदकवार, सचिव प्रा. संतोष चिंतावार उपस्थित होते.