स्थानिक कलाकारांची शॉर्ट फिल्म ‘रेडियो 1947’ चा टिझर प्रकाशित
वणीतील युवा अक्षय रामटेके यांनी केले दिग्दर्शन
जब्बार चीनी, वणी: वणीतील युवा दिग्दर्शक अक्षय रामटेके यांच्या आगामी ‘रेडियो 1947’ या शॉर्ट फिल्मचा टिझर युट्युबवर रिलिज करण्यात आला आहे. या शॉर्टफिल्ममध्ये आपल्या परिसरातीलच सर्व कलाकार व तंत्रज्ञ आहेत. अविनाश शिवनीतवार, कीरण येसेकर, मोना पेंदोर यांच्यासह हर्षद गहुकर, मुकेश दौलतकर, गणेश आसुटकर यांनी यात भूमिका केली आहे. ही शॉर्टफिल्म शुक्रवारी दिनांक 18 जून रोजी युट्युबवर रिलिज केली जाणार आहे.
‘रेडियो 1947’ ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एका रेडियो प्रेमी तरुणाची कथा आहे. त्याने स्वातंत्र्याच्या लढाईत त्याचे आई वडील गमावले आहे. तरुणाचे आई वडील मृत्यूआधी मुलाला रेडियो गिफ्ट देतात. आई वडिलांची शेवटची आठवण असलेला हा रेडियो, तरुणाचे रेडियो प्रेम त्याचा त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम, स्वातंत्र्य मिळणे इत्यादी भोवती ही कथा फिरते.
या शॉर्टफिल्मची कथा हर्षद गहुकर यांची आहे. सिनेमॅटोग्राफी अतुल खोब्रागडे यांची तर वेशभुषा शंकर घुगरे यांची आहे. दिग्दर्शक अक्षय रामटेके यांनी स्थानिक कलाकार व तंत्रज्ञ यांना सोबत घेऊन अनेक शॉर्टफिल्म व म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. दोन महिन्याआधीच त्यांनी दिग्दर्शीत केलेली शॉर्टफिल्म स्माईल ही युट्युबवर प्रकाशित झाली आहे.
शॉर्टफिल्मचा टिझर पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
हे देखील वाचा:
[…] […]