जितेंद्र कोठारी, वणी: रविवार 2 मे रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान 5 वाहनांचा काफ़िला वेगाने वणी शहरात दाखल झाला. वाहनांतून आलेले तब्बल 26 जणांनी 4 वाजता एका कोळसा व्यावसायिकांच्या घराची बेल वाजवली. मात्र गाढ झोपेत असल्यामुळे कोणीही दार उघडले नाही. शेवटी आलेल्या लोकांनी वणी पोलिसांच्या मदतीने 5 वाहत सुमारास घरात प्रवेश केला. आगंतुकानी सदर कोळसा व्यावसायिकाच्या घराची तीन तास झडती घेतली. हा सर्व काही प्रकार घडत असताना पहाटे पहाटे वणीत कोळसा व्यापाऱ्याच्या घरी सीबीआयची धाड पडल्याची अफवा उडाली. मात्र नंतर खरे प्रकरण बाहेर आले.
प्राप्त माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मंथानी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व पेद्दापल्ली जिल्हा परिषदचे चेअरमन पुट्टा मधुकर हे सध्या फरार आहे. पुट्टा मधुकर याचे वणी येथील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्यांसोबत चांगले संबंध आहे. शनिवारी 1 मे रोजी पुट्टा मधुकर हा वणी येथे असल्याची गुप्त माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस अधीक्षक, एक सर्कल इन्स्पेक्टर, चार पोलीस निरीक्षक समावेश असलेले 20 ते 25 पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने आज पहाटे वणी गाठले.
मात्र त्यापूर्वी आरोपी पुट्टा मधु येथून फरार झाला. त्यामुळे पोलीस पथकाला कोळसा व्यावसायिकाच्या घरातुन आरोपी माजी आमदार मिळून आला नाही. आरोपी पुट्टा मधुकर हा शनिवारी घरी आला असल्याची कबुली सदर कोळसा व्यापाऱ्यांनी तेलंगणा पोलिसांना दिली. फसवणुकीच्या एका गुन्ह्यात आरोपी पेद्दापल्ली जिल्हा परिषद अध्यक्ष पुट्टा मधुकर याचा तेलंगणा पोलीस शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.
मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात तेलंगणा हायकोर्टाचे वकील वामनराव आणि त्यांच्या वकील पत्नी नागमणी या दाम्पत्याच्या खून प्रकरणात तेलंगणा पोलीस पुट्टा मधुकर यांचा कसून शोध घेत आहे. या प्रकरणी पुट्टा यांचा पुतण्या बिट्टू श्रीनिवास यास पोलिसांनी आधीच अटक केली आहे.
हे देखील वाचा: