लालपुलिया परिसरात आढळला वृद्धाचा मृतदेह

अन्न पाणी न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

0

विवेक तोटेवार, वणी: रविवार 25 एप्रिल रोजी शहरातील लालपुलिया परिसरातील एका कोळसा प्लॉंन्टजवळ दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. कोळसा प्लॉट वरील सुपरवायजरने याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली आहे.

रविवार दुपारी लालपुलिया येथील प्लॉट जवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती प्लॉट वरील चौकीदाराने सुपरवायजर प्रवीण यास दिली. प्रविनने याबाबत वणी पोलिसात माहिती दिली. पोलिसांनी जाऊन बघितले असता त्यांना सदर इसमाचे वय अंदाजे 70 ते 75 असल्याचे आढळून आले.

अन्न, पाणी न मिळाल्याने या वृद्धाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या इसमाच्या हातावर एकनाथ असं नाव गोंदवून आहे. या घटनेचा प्राथमिक तपास प्रभाकर कांबळे करीत आहे.

हे देखील वाचा:

साईमंदिर ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत होणार 4 लेन सिमेंट रोड

भालर कॉलनीत कोरोना विस्फोट, 37 रुग्णांची कोरोनावर मात

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!