भालर कॉलनीत कोरोना विस्फोट, 37 रुग्णांची कोरोनावर मात

आज तालुक्यात कोरोनाचे 72 रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 25 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 72 रुग्ण आढळलेत. आज तालुक्यात 72 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 19 रुग्ण, ग्रामीण भागात 40 रुग्ण तर अन्यत्र 13 रुग्ण आहेत. भालर कॉलनीत 16 रुग्ण आढळलेत.

वणीतील जैन ले आऊट 5, गुरुनगर 2, विठ्ठलवाडी २ आणि ब्राह्मणी फाटा, विराणी टॉकीज परिसर, आनंदनगर, काळे ले आऊट, देरकर ले आऊट, भगतसिंग चौक, विद्यानगरी, देरकर ले आऊट, शास्त्रीनगर, इंदिरा चौक या भागांत प्रत्येकी 1 रुग्ण आढळला.

ग्रामीण भागात उकणी 4, राजूर 3, सुंदरनगर 3, निळापूर 2 आणि चिखलगाव, लालगुडा, तरोडा, शेलू, बेलोरा, पिंपळगाव, पिंपरी, मंदर, पुरड, मोहदा, शिरपूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला.

आज सध्या तालक्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 597 झाली आहे. आज 37 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली.

आज यवतमाळ येथून 512 अहवाल प्राप्त झालेत. यात 67 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 21 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 192 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1305 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 597 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 33 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 524 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 40 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 2760 रुग्ण आढळून आलेत. यातील 2068 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 41 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

रासा येथून सुमारे 10 लाखांचा प्रतिबंधीत तंबाखुचा साठा जप्त

हे देखील वाचा:

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.