निर्गुडा नदीच्या तिरावर आढळला मृतदेह

आज दुपारची घटना, मृतकाची ओळख अस्पष्ट

0

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील निर्गुडा नदीत शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनेची महिती वणी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

वणीच्या निर्गुडा नदीपात्रात शुक्रवारी दुपारी 11 वाजता सुमारास जॅकवेल जवळ एका इसमाचा मृतदेह आढळला. या इसमाचे वय अंदाजे 45 सांगितले जात आहे.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. वृत्त लिहितपर्यंत मृतकाची ओळख पटली नाही. घटनेचा प्राथमिक तपास प्रकाश गोरलेवार करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.