द बर्निंग कार : भांदेवाडा येथे धावत्या कारला आग

सुदैवाने जीवित हानी टळली

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील प्रख्यात श्रीक्षेत्र भांदेवाडा तीर्थक्षेत्र परिसरात शुक्रवारी एका बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. सायंकाळी 5.15 वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेत कार चालकाचे प्राण थोडक्यात वाचले.

Podar School 2025

माहितीनुसार एक हुंडाई असेन्ट कार भांदेवाडा येथील WCL ऑफिस जवळ पोहचली असता चालकाला कारच्या बोनट मधून धूर निघताना दिसला. काय झाला म्हणून बघण्यासाठी कार चालक इंजिन बंद करून खाली उतरला. मात्र तेव्हापर्यंत इंजिनमधून आगीचे लोळ उठले होते. पाहता पाहता संपूर्ण कारने पेट घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेची माहिती मिळताच वणी येथून अग्निशमन वाहन पाठविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली. बर्निंग कार गडचिरोली जिल्ह्यातील असून कारचालकांनी घटनेबाबत अद्याप वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

83: भारताच्या वर्ल्डकप विजयाचा रोमांचकारी प्रवास

Comments are closed.