सेक्स रॅकेटचे पाळंमुळं शोधून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान (भाग 3)

ऑडिओ क्लिपमधील 'त्या' दोघांकडून मिळू शकते मोठी माहिती

0

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात अत्यंत गुप्तपणे व नियोजनबद्ध सुरु ऑनलाइन सेक्स रॅकेटचे पाळंमुळे शोधून काढण्याचे वणी पोलिसांपुढे आव्हान आहे. शहरातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या या अनैतिक व्यवसायाबाबत पोलीस विभागाकडेही पुरेशी माहिती आहे. मात्र तक्रार, सबळ पुरावे आणि इच्छाशक्ती अभावी पोलीसही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे थेट व्हॉट्सऍपच्या स्टेटसमधून सेक्सवर्कर्सची माहिती पुरवण्याइतपत सेक्स रॅकेट चालकांची मजल गेली आहे.

वणी शहराचे पूर्व व पश्चिम या दोन्ही टोकावर मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट सुरू आहे. सदर रॅकेट या महिला चालवत असल्याची माहिती आहे. तर या दोन टोकांच्या मध्येही एक सप्लायर यांना टफ कॉम्पिटिशन देत खंबीर उभा आहे. रॅकेट चालकांद्वारे ग्राहकांच्या मागणीप्रमाणे शहरातील आंबट शौकिनांना सेक्सवर्कर पुरवल्या जातात. अनेक लोक सुरक्षेच्या कारणासाठी बाहेरगावाहून सेक्सवर्कर बोलवण्याची मागणी करतात. अशा ग्राहकांना खास चंद्रपूरवरून सेक्सवर्कर आणून त्यांची मागणी पूर्ण करून दिली जाते. याशिवाय शहरातील रॅकेट चालकांचे चंद्रपूरच्या रॅकेट चालकांशी संपर्क असून मागणीप्रमाणे हे संचालक एकमेकांकडे सेक्सवर्कर एक्सचेंज देखील करतात अशी माहिती आहे.

व्हॉट्सऍपच्या स्टेटसवरून दिली जाते सेक्सवर्कर्सची माहिती
सेक्स रॅकेट संचालकांनी या व्यवहारासाठी व्हॉट्सऍपचे बिजनेस अकाउंट तयार केले आहे. यात नेहमीच्या ग्राहकांचे नंबर सेव केले जाते. स्टेटस सेटिंग ही ‘सी ओन्ली माय कॉन्टॅक्ट’ केली जाते. या अकाउंटच्या स्टेटसमधून मुलींचे फोटो व दर पोस्ट केले जातात. हे स्टेटस केवळ नंबर सेव केलेल्या व्यक्तींनाच दिसत असल्याने हे काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येत नाही. बाहेरगावाहून कॉलगर्ल वणीत येण्याच्या वेळी असे स्टेटस टाकण्याची शक्कल लढवली जाते, अशी माहिती सूत्रांकडून ‘वणी बहुगुणी’ला मिळाली आहे. या नवीन फंड्याची शहरात खुमासदार चर्चा आहे.

कोरोना काळात मिटली ‘दो गज की दुरी’
कोरोना काळात ‘दो गज की दूरी’ ठेवा असे सांगितले जात होते. मात्र या काळातही शहरातील काही प्रतिष्ठीत आंबट शौकिनांनी ‘दो गज की दुरी’च मिटवून टाकली. कोरोनाची पर्वा न करता या काळातही हा व्यवसाय छुप्या पद्धतीने चांगलाच चालला. कोरोना काळात बस बंद असल्याने शिवाय वाहतुकीसाठी परवान्याची गरज होती. त्यामुळे बाहेरगावाहून सप्लाय होण्यास अडचण येत असल्याने लोकल सेक्स रॅकेट चालकांची व लोकस सेक्सवर्करची चांगलीच चांदी झाली. याशिवाय बाहेरगावाहून शहरात ‘खास’ व्यवसायासाठी काही दिवसांसाठी आलेल्या सेक्सवर्करनेही कोरोना सिजन यशस्वीरित्या काढला.

गेल्या अनेक वर्षांपासून वणीत सेक्स रॅकेट सुरू आहे. मात्र गेल्या एक दोन वर्षांपासून वणी शहरात सेक्स रॅकेटचं जाळं झपाट्यानं वाढलं. आज  हा व्यवसाय शहरात पिक पॉइंटवर आहे. व्हाट्सएप व इतर सोशल मिडिया ऍपच्या माध्यमातून अनेक तरुणांसह शहरातील काही प्रतिष्ठित म्हणून गणले जाणारे व्यक्तिसुद्दा सेक्स रॅकेट संचालकांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. नुकतेच आरोग्य सेवेशी निगडित शहरातील दोन व्यक्तीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. दोघांमधील संभाषणात शहरातील सेक्स रॅकेटसंबंधी व कॉलगर्लच्या रेट संदर्भात उल्लेख आहे.

शहरालगत नव्याने उदयास आलेल्या अनेक वसाहती व त्यातील बहुमंजिली सदनिकेमधून संचालीत होणाऱ्या या सेक्स रॅकेटचे पाळंमुळं खोदण्यासाठी पोलिसांनी सर्वात आधी व्हायरल ऑडिओ क्लिपमधील दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस करणे गरजेचे आहे. यांची चौकशी केल्यास शहरातील सर्व छोटे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर दोन्ही व्यक्तीच्या “मोबाईल डंप डेटा” काढल्यास अनेक गुपित उघड होण्याचीही शक्यता आहे. आता याकडे पोलीस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्रमश:

हे देखील वाचा:

मध्यरात्री पोलिसांची दारू तस्करांवर कार्यवाही, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

सेक्स रॅकेटच्या फंद्यात अडकले अनेक हायप्रोफाईल? (भाग 2)

खावटी अनुदानाचे वाटप न केल्यास आंदोलनाचा इशारा

 

Leave A Reply

Your email address will not be published.