शेतकऱ्याने हेतुपुरस्सर मारले दुस-याच्या शेतावर घातक तणनाशक

पोलीसात तक्रार दाखल, शेतकऱ्याचे झाले सहा एकर कपासीचे नुकसान.

0

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील केगाव येथील शेतकरी शुंभू महादेव टोंगे यांनी त्यांच्या शेतातील कपाशीवर घातक तणनाशक फवारल्याची तक्रार केली आहे. शेतकरी गजानन रघुनाथ डाखरे या शेतकऱ्याने त्यांच्या धु-यावर 2 4D या तणनाशकाची फवारणी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केलीये.

केगाव येथे गट क्र. ८०, क्षेत्रफळ २ हेक्टर, १९ आर, इतक्या लागवडीस असलेल्या कपाशीवर गजानन डाखरे यांनी तणनाशक फवारल्याचा आरोप शुंभू टोंगे यांनी केला होता. या बाधीत झालेल्या कपाशीची पाहणी तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(अट्टल घरफोड्या मोबाईल अडकला पोलिसांच्या जाळ्यात)

दासरवार यांनी घातक तणनाशकामूळे नुकसान झाल्याचा अहवाल दिला तसंच ही घटना नैसर्गिक आपत्तीत येत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या तणनाशकाचा परिणाम हवेमुळे दुरवर होत असल्याने सखोल तपासणीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ असं देखील ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.