डॉक्टर मुलाच्या मृत्यूनंतर वडीलांचेही कोरोनाने निधन
डॉ. प्रशांत चांदेकर व लक्ष्मणराव चांदेकर यांच्या निधनाने वणीत शोककळा
जितेंद्र कोठारी, वणी: चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर डॉ. प्रशांत लक्ष्मणराव चांदेकर (35) यांचे 30 एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर सोमवार 10 मे रोजी त्यांचे वडील लक्ष्मणराव चांदेकर यांचेही निधन झाले. आदिवासी विकास महामंडळ येथून सेवानिवृत्त लक्ष्मणराव चांदेकर हे वणी शहरात आनंदनगर येथे राहत होते. कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान चंद्रपूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये औषधी विभागीय असोसिएट प्रोफेसर पदावर कार्यरत त्यांचा मुलगा डॉ. प्रशांत चांदेकर यांनाही कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या भीषण काळात त्यांनी अनेक रुग्णांना सेवा दिली मात्र त्यांना सुद्धा कोरोनाने आपल्या बाहुपाशात ओढले. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे ऑक्सिजन लेव्हल कमी झाले. डॉ. प्रशांत यांना नागपूर येथे नेत असल्यानं वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
कोरोना आजाराशी झुंज देत असताना लक्ष्मणराव चांदेकर यांना मुलाच्या मृत्युची बातमी ऐकून धक्का बसला. त्यानंतर लक्ष्मणराव यांची तब्येत आणखी खालावली. व 10 मे रोजी सायंकाळी त्यांनीही जगाचा निरोप घेतला. 10 दिवसाच्या कालावधीत चांदेकर पिता पुत्राच्या निधनाने संपूर्ण वणीत शोककळा पसरली.
हे देखील वाचा:
दिलासादायक: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट