कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी, भाजपचा आरोप
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात निवेदन
जब्बार चीनी, वणी: आज संपूर्ण देश कोविड- 19 विषाणूच्या चक्रव्यूहात अडकलेला असतांना भारतातील सर्व राज्य युद्ध स्तरावर या विषाणूचा सामना करीत आपापल्या राज्याला सुरक्षित ठेवत आहेत. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकार या विषाणूचा सामना करून महाराष्ट्राला पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून या संकट काळात सरकारने युद्ध स्तरावर उपाययोजना करून राज्याला या संकटातून मुक्त करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करून या संबंधीचे निवेदन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्रातील नेत्यांनी दिली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले कि, कोविड १९ महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील कोरोनाचा विळखा आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याने स्वत: कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. केंद्रसरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टिका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे.
स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या,गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असणे, रुग्णसंख्या लपविणे, मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे,इतर सर्व राज्य विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवीत आहे. राज्यातील पोलिसांची अवस्था तर अतिशय विदारक आहे. त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत.
इतर सर्व राज्य विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवीत आहे. त्यामुळे इतर राज्यांतील सरकारांनी दिलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांना मदत द्यावी, कोरोनाचे संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात. अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, सभापती संजय पिंपळशेंडे, वणी शहर माजी अध्यक्ष रवि बेलुरकर, तालुका अध्यक्ष गजानन विधाते,शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, जि.प.सदस्य बंडुभाऊ चांदेकर, नगरसेवक संतोष डंभारे, नगरसेवक राकेश बुग्गेवार, सचिन खाडे कैलास पिपराडे, अरुण कावटकर, संदीप बेसरकर,सत्यजीत ठाकुरवार, दिपक रासेकर, व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.