ताडोबातील श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी

घात की अपघात? लवकरच उलगडणार रहस्य

0

नागेश रायपुरे, मारेगाव: सोनेगाव जवळील आसन (उजाड) येथे मंगळवारी एका वाघिणीचा मृत्यू प्रकरणी तपासाला सुरुवात झाली आहे. आज बुधवारी दिनांक 24 मार्च रोजी  डॉग स्क्वॉड (श्वान पथक) मदतीने घटनस्थळी तपासणी करण्यात आली. उद्या देखील श्वान पथकाद्वारे तपास सुरूच राहणार आहे. दरम्यान पांढरकवडा येथे पॉली क्लिनिक हाऊसमध्ये वाघिणीचे पोस्ट मॉर्टम करण्यात आले. सदर सॅम्पल यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 3 ते 4 दिवसांमध्ये त्याचा रिपोर्ट येणे अपेक्षीत आहे.

रान डुकरासाठी ज्या प्रमाणे तारांचे फास लावतात त्याच पद्धतीने लावण्यात आलेल्या फासात वाघिण अडकलेली आढळून आली होती. तस्करीसाठी हा फास लावण्यात आला होता ? की रान डुकरांसाठी लावण्यात आलेल्या फासात वाघिण अनावधानाने अडकली याचा तपास करण्यासाठी ताडोबाहून खास श्वान पथक (डॉग स्कॉड) यांना पाचारण करण्यात आले. त्याद्वारा परिसरात आढळून आलेल्या वस्तूंचा तपास सुरू करण्यात आला आहे. याशिवाय इतर ऍन्गलनेही प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हल्ला करणारी वाघिण तिच का?
गेल्या आठवड्यात परिसरातील एका शेतक-यांच्या शेळ्यावर वाघाने हल्ला करून फस्त केल्या होत्या. तसेच बंदी वाढोणा येथे तीन व्यक्तींवर वाघाने हल्ला केला होता. ती हिच वाघिण होती असा दावा परिसरातील नागरिक करीत आहे. मात्र हल्ला करणारी वाघिण तीच होती का याबाबत निश्चित सांगता येत नाही. तसेच या मृत्यूमागे घात आहे की अपघात हे देखील पोस्ट मॉर्टम रिपोर्ट नंतरच कळेल अशी माहिती विक्रांत खाडे यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

मारेगाव वनपरीक्षेत्रात येथ असलेल्या सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 ते 3 वाजताच्या दरम्यान एक वाघिण मृतावस्थेत आढळून आली होती. या वाघिणीचे वजन सुमारे 130 ते 150 किलो होते. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मृत वाघिणीला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

हे देखील वाचा:

वेश बदलून जुगार अड्ड्यावर धाड, शिरपूर पोलिसांची धाडसी कारवाई

आज तालुक्यात 7 रुग्ण, राजूर येथे आढळले 2 रुग्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.