कोरोना दिवंगतांच्या स्मृतीला वृक्षारोपणातून उजाळा
"एक झाड- एक स्मृती' उपक्रमाची सोमनाळा येथून सुरवात
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळात मृत पावलेल्या लोकांच्या स्मृतीला उजाळा देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणचा आगळा वेगळा उपक्रम तालुक्यात राबविण्यात येत आहे. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडल, राष्ट्रधर्म युवा मंच, राष्ट्रसंत युवक युवती मंच व त्रिशरण एनलाईटमेन्ट ग्रुप तर्फे संयुक्तरित्या “एक झाड-एक स्मृती’ या नावाने उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.
तालुक्यातील झरपट, निंबाला व सोमनाळा गावात दि 25 जुलै रोजी दिवंगत आत्म्यांच्या स्मृतीमध्ये 30 वृक्षांची लागवड करून या उपक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. यापुढे तालुक्यातील वांजरी, नांदेपेरा, पळसोनी, मूर्धोनी, चारगाव, शिरपूर व इतर अनेक गावांत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमात सदर झाड हे कुटुबीयांच्या हाताने त्यांच्याच घरातील अंगणात लावण्यात येते.
दि.25 जुलै रोजी तालुक्यातील निंबाळा, सोमनाळा इथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सरपंच सुनीता ढेंगळे, उपसरपंच राहुल कुत्तरमारे, पशु वैद्यकीय अधिकारी रेड्डीवार, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे मारोतराव ठेंगणे, दिलीप डाखरे, राजू ढेंगळे, रामकृष्ण ताजणे, प्रवीण पेचे, राष्ट्रसंत युवक युवती विचार मंच व राष्ट्रधर्म युवा मंचचे संघदीप भगत, अभिलाष राजूरकर, भारत कारडे, उदयपाल वणीकर, राहुल धुळे, संदीप कुचनकर , संकेत ताजने, संदीप माटे तसेच किसन शेंडे, प्रभाकर ढोके, बंडू झाडे, ईश्वर काळे, विठ्ठल केराम, मीराबाई कुचनकार, नितीन ढोके अमित बरडे हे ग्रामस्थ उपस्थित होते.
हे देखील वाचा: