ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील सरपंचाचं सरपंच पद रद्द करण्यात आलंं आहे. अतिक्रमण करून शेती केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हा परिषद यवतमाळनं या प्रकरणाची दखल घेऊन ही कार्यवाही केली आहे.
कमलाबाई उत्तम कनाके या कोसारा इथल्या सरपंच आहे. त्या अतिक्रमण करुन शेती करीत असल्याची तक्रार पंचायत समितीकडे दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मारेगाव तालुका युवा सेना अध्यक्ष सचिन पचारे आणि विशाल किन्हेकार यांनी या संदर्भात पत्र दिलं होतं. त्यानंतर सतत या बाबीचा पाठपुरावा केल्याने विभागीय आयुक्त अमरावती यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली.
(हे पण वाचा: नारीशक्तीचा विजय ! कायर येथील महिलांनी पकडली अवैध दारू)
चौकशीत त्या अतिक्रमण करून शेती करण्याचं स्पष्ट झालं, त्यामुळे चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषद यवतमाळनं आदेश देऊन सरपंच पद रद्द करण्याचा आदेश दिला. त्यानुसार कमलाबाईंचं सरपंचपद रद्द करण्यात आलं. सध्या सरपंचाचा प्रभार उपसरपंच अंबादास देवतळे यांच्याकडे आला आहे.