पाणी पुरवठा करणाऱ्या मोटरपंपाचा केबल चोरट्यांनी केला लंपास

शिंदोला खाणीतील घटना, तक्रार दाखल

0

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दगडाच्या खाणीत टाकलेल्या मोटारपंपाचा केबल चोरट्यांनी लंपास केला. सदर घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत सरपंच विठ्ठल बोंडे यांनी शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली.

वणी तालुक्यातील शिंदोला गावाला पाणी पुरवठा योजनेसाठी माईन्सच्या खाणीत मोटार टाकण्यात आली. सदर खाणीतून पाईपलाईनद्वारे टाकीत पाणी आणल्या जाते. मात्र यासाठी टाकलेल्या मोटारपंपाचा केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या केबलची किंमत 30 हजार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिरपूर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. शिंदोला परिसरातील शिवारात जलसिंचनाचे केबल, स्प्रिंक्लर आदी साहित्य चोरी जाण्याच्या घटना घडत असतात. मात्र तक्रार देऊनही चोरट्यांचा सुगावा लागत नाही. त्यामुळे अनेकजण पोलिसात तक्रार देण्याचे टाळतात.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.