अंगणात ठेवलेल्या कापसावर चोरट्यांचा डल्ला

शिंदोला येथील घटना, अज्ञान चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेंढोली येथील एका शेतकऱ्यांच्या अंगणातून अज्ञात चोरट्यांनी कापूस चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मेंढोली येथील शेतकरी तथा वेकोलि कर्मचारी किशोर ढवस यांच्या शेतातील वेचलेला कापूस अंगणात साठवून ठेवला आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी ढिगाऱ्यातील जवळपास एक क्विंटल कापूस चोरून नेला. यात ढवस यांचे आठ ते नऊ हजारांचे नुकसान झाले आहे. सदर घटना शनिवारी उघडकीस आली. घटनेची तक्रार शिरपूर ठाण्यात नोंदविली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.

Comments are closed.