विद्युत लाईनवरील 39 स्पॅन तार आणि 67 इन्सुलेटरची चोरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा सबस्टेशन ते साखरा (दरा) या लाईन वरील एकूण 39 स्पॅन (1.9 किमीची) ऍल्युनिमियम तार व 67 इन्सुलेटर चोरीला गेले. यात महावितरणचे 2 लाख 75 हजार 74 रुपयांचे नुकसान झाले. सदर चोरी ही 28 मार्च 2023 ते 3 मे 2023 च्या दरम्यान झाली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

वणी शहरालगत लालगुड्याजवळ महापारेषणचे सबस्टेशन (पॉव्हर हाऊस) आहे. या सबस्टेशनवरून दरा साखरा येथे 33 केव्हीची लाईन गेली आहे. 28 मार्च रोजी महावितरणने या लाईनची पाहणी केली असता या लाईनवरील ऍल्युमिनियमची 3 गाळे (150 मीटर) तार व 6 इन्सुलेटर चोरीला गेल्याचे आढळले. तर 10 मार्च रोजी पाहणी केली असता लालगुडा जवळील पुरोहित सिमेंट कंपनीच्या मागील बाजूस असलेली 10 गाळे (500 मीटर) तार व 15 इन्सुलेटर चोरीला गेल्याचे आढळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

3 मे रोजी झालेल्या तपासणीत लालगुडा सबस्टेशन समोरील 4 गाळे तार, 6 इन्सुलेटर, लालगुडा एमआयडीसी ते वणी घुग्गुस रोड जुना वागदरा या लाईन वरील 5 गाळे तार व 6 इन्सुलेटर आणि नवीन वागदरा ते वणी-कायर रोडवरील 17 गाळे तार व 33 इन्सुलेटर चोरीला गेल्याचे आढळले. दोन महिन्या एकूण 39 स्पॅन (1.9 किमीची) तार व 67 इन्सुलेटर चोरीला गेले आहे.

चोरीला गेलेल्या 67 इन्सुलेटरची किंमत ही सुमारे 36 हजार असून ऍल्युमिनियम तारांची किंमत ही सुमारे 2 लाख 38 हजार आहे. या चोरीत महापारेषणचे सुमारे पावने तीन लाखांचे नुकसान झाले आहे. सातत्याने होणा-या चोरीमुळे महावितरण केंद्र घोन्सा उपविभागाचे अभियंता पंकज नंदलवार यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरोधात भारतीय विद्युत अधिनियमच्या कलम 136 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.