प्रेमनगर परिसरात खंजीर घेऊन धुमाकूळ घालणा-या तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा रोडवरील प्रेमनगर परिसरातील रस्त्यावर खंजीर घेऊन धुमाकुळ घालणा-या तरुणाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी वरोरा येथील एका तरुणास अटक केली. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दिनांक 4 मे रोजी रात्री वणी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना प्रेमनगर परिसरालगत असलेल्या रस्त्यावर खंजीर घेऊन धुमाकूळ घालीत असल्याची माहिती मिळाली. सोबतच त्याच्या दहशतीमुळे परिसरातील दुकानदार घाबरून दुकाने बंद करीत असल्याचेही कळले. या माहितीवरून रात्री 9.15 वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक प्रेमनगर गेले असता तिथे एक तरुण हातात खंजीर घेऊन आढळला.

सदर तरुण हा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रस्त्यावर उपस्थित नागरिकांना धमकावत असल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी योजना आखली व तरुणाला शिताफिने मागून जाऊन पकडले. त्याच्या हातातील शस्त्र पोलिसांनी जप्त केले. सदर तरुणाचे नाव शुभम उत्तम टोरे (21) असून तो दत्त मंदिर वार्ड वरोरा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

वणी पोलिसांनी वरोरा पोलिसांना संपर्क साधून माहिती काढली असता पोलिसांना सदर तरुणाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून त्याच्यावर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शस्त्र अधिनियमच्या कलम 1 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला. सदर कारवाई स.पो.नि दत्ता पेंडकर, हे.कॉ. विशाल गेडाम, पोकॉ. शंकर चौधरी, पुरुषोत्तम डडमल इत्यादींनी केली.

हे देखील वाचा: 

Guardians of the Galaxy 3 – जगाला वाचवण्याची एक रोमांचक लढाई…

रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट

Comments are closed.