अबब ! चोरट्यांनी मारला चक्क ट्रान्सफॉर्मरच्या तारवर डल्ला

शेतीचा वीजपुरवठा खंडित, सावंगी येथील घटना

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथील गावालगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील तार आणि इतर साहित्याची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. परिणामी सदर ट्रान्सफॉर्मर वरून शेतीचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सावंगी लहान ते मोठी सावंगी रस्त्याच्या कडेला शेतीसाठी वीजपुरवठा करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले. यावरून बहुतांश शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत आहेत. मात्र, रात्री उशिरा चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार आणि अन्य साहित्य लंपास केले आहेत.

याप्रकारामुळे शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सध्या शेतात गहू, हरभरा आदी पिकांच्या पेरण्यांची लगबग सुरू आहे. अशा वेळी वीज पुरवठा खंडित झाला आहे. शिरपूर वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हे देखील वाचा:

कृषी केंद्राच्या गोदामामध्येच कर्मचा-याची आत्महत्या

विधवा महिलेचे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण

आनंदाची बातमी… वणी सुरू होत आहे फुड डिलिव्हर ऍप

Comments are closed.