विवेक तोटेवार, वणी: रविवारी दुपारी 1 वाजता दरम्यान तालुक्यातील मोहूर्ली ते विरकुंड जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जंगलात कोंबड्याची झुंजीवर जुगार खेळणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत एकूण 2 लाख 33 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
12 डिसेंबर रोजी ठाणेदार श्याम सोनटक्के यांना गोपनीय माहिती मिळाली की मोहुर्ली-विरकुंड रस्त्यावर काही इसम कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळत आहे. माहितीवरून ठाणेदारांनी डीबी पथकास पाचारण केले. मोहूर्ली ते विरकुंड मार्गावर एका जंगलात कोंबडीच्या झुंजीवर जुगार खेळणे सुरू होते. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारला.
या कारवाईत दोन कोंबडे, लोखंडी काती, 3 दुचाकी, तीन मोबाईल, नगदी असा एकूण 2 लाख 33 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत झुंज लावणाऱे जगदीश गुरूचरण पाटील (38) रा. राजूर कॉलरी, विठ्ठल लटारी पिंपलशेंडे (58) रा. नायगाव व विजय मधुकर फटाले (38) पटवारी कॉलनी लालगुडा यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलोस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पूज्जलवार उपविभागीय पोलीस अधीकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या आदेशावरून पोउनि शिवाजी टिपूर्णे, पोऊनि आशिष झिमटे, डीबी पथक कर्मचारी सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, हरींद्र भारती, विशाल गेडाम, शंकर चौधरी, अमोल नूनेलावार यांनी केली पुढील तपास पोउनि शिवाजी टिपूर्णे करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.