बहुगुणी डेस्क, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा येथे एका जुगार अड्ड्यावर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत तिघांना मुकुटबन पोलिसांनी ताब्यात घेतले. धाड जरी यशस्वी झाली असली तरी धाडीचा टायमिंग चुकल्याने फक्त वृद्ध हाती आले व प्रतिष्ठीत लोक सुटले अशी चर्चा परिसरात होत आहे.
मुकुटबनचे ठाणेदार अजित पवार यांना खबरी द्वारा कोसारा येथे जुगार अड्डा भरत असल्याची माहिती मिळाली. त्याद्वारे पोलीस पथकाने दुपारी पाऊन वाजताच्या सुमारास गावातील कडु यांच्या घराजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ सार्वजनिक ठिकाणी धाड टाकली. यावेळी तिथे त्यांना तिघे जण पत्यांवर पैशाचा डाव खेळत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी मधुकर उर्किडा भोयर (60), विकास राघोबा कडु (36) शामराव भिवाजी भोयर (60) सर्व रा. कोसारा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे एकूण 450 रुपये नगदी आढळून आले. त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टायमिंग चुकल्याने फक्त वृद्ध आले हाती
ज्या ठिकाणी धाड टाकण्यात आली त्या ठिकाणी दररोज दुपारी सुमारे 12 वाजता पत्ता जुगाराला सुरुवात होते. दुपार नंतर जुगार चांगलाच रंगात येतो. हा जुगार सायंकाळ पर्यंत चालतो. मात्र पोलिसांनी ज्या वेळी धाड टाकली त्यावेळी नुकताच जुगार सुरू झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या हाती वृदध आढळून आले. तसेच मोठी रक्कमही हाती लागली नाही. पोलिसांचे टायमिंग चुकल्याने गावातील अनेक प्रतिष्ठीत लोक बचावले असे बोलले जात आहे.
सदर कारवाई मुकुटबनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात खुशाल सरपाम, मोहन कुडमेथे, रंजना सोयाम, संजय खांडेकर यांनी केली. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावात छुप्या रितीने जुगार चालतो. त्याबाबत कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.