नागेश रायपुरे, मारेगाव: वर्धा नदीवरील कोसारा घाटातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे तीन वाहणे मारेगाव पोलिसांनी मध्यरात्री जप्त केले. हे तिन्ही ट्रॅक्टर चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. या कारवाईत 3 ब्रास रेतीसह 14 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर 3 आरोपी फरार आहे. तस्करांनी काल महसूल विभागाचे कामबंद आंदोलन असल्याचा फायदा घेत तस्करी करण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील उमरखेड येथील महसूल कर्मचा-यावर रेती माफियानी चाकू हल्ला केला होता. याच्या निषेधार्थ गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात महसूल कर्मचा-याचे काम बंद आंदोलन होते. याचा फायदा घेत काही तस्कर तालुक्यातील वर्धा नदीच्या कोसारा घाटातून रेतीची मोठी तस्करी करीत असल्याची माहिती ठाणेदार जगदिश मंडलवार यांना रात्री खबरीकडून मिळाली.
ठाणेदारांनी याची माहिती वरिष्ठांना देत ते त्यांच्या चमुसह दापोरा मार्गावर गेले. तिथे ते दबा धरून बसले. रात्री दीड वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर क्र. (MH34-BG.0131) (MH34 BR-9349) आणि (MH34 BR 6852) हे तीन ट्रॅक्टर रेती भरुन येत असताना दापोरा मार्गावर आले. पोलिसांनी तीनही ट्रॅक्टरला थांबऊन चौकशी केली असता या तिन्ही ट्रॅक्टरद्वारा चोरट्या मार्गाने अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी हे तिन्ही वाहणे जप्त करत आरोपी रुपेश भडके (25) रा. निलजाई ता. वरोरा, सुभम पुसनाके (20) रा.बोरी ता वरोरा. अक्षय बोढे (22) रा. बोरी ता. वरोरा, गणेश वैद्य (20) रा. बोरी ता वरोरा, प्रफुल्ल कुरेकर (25) रा.बोरी ता वरोरा संदीप जवादे (30) रा.सोइट ता.वरोरा यांना ताब्यात घेतले. तर आरोपी विकास वैद्य (34) रा बोरी ता वरोरा, आकाश बावने (25) रा निलजई ता वरोरा, विठ्ठल देवतळे (55) वर्ष रा सोइट ता वरोरा हे फरार आहे.
पोलिसांनी 18 हजार रुपयांची तीन ब्रास रेती व 14 लाख रुपये किमतीचे तीन ट्रॅक्टर आणि रेती भरायचे साहित्य जप्त केले आहे. आरोपींवर भादंविच्या कलम 378, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मारेगाव पोलिसांच्या या कार्यवाहीने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. रेती तस्कर दुस-या जिल्ह्यातून येऊन तस्करी करताना आढळले असल्याने याची चांगलीच चर्चा परिसरात रंगत आहे.
हे देखील वाचा: