वाघाने पुन्हा पाडला गायीचा फडशा, सगल दुस-या दिवशीही शिकार

निंबादेवी नंतर आता कारेगाव येथे वाघाचा जनावरावर हल्ला

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कारेगाव शिवारात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. रविवारी निंबादेवी इथे एका गो-ह्याची शिकार केल्यानंतर जवळच असलेल्या कारेगाव येथे वाघाच्या हल्ल्याची दुसरी घटना आहे.  वाघाच्या सततच्या जनावरांवरील हल्ल्याने परिसरातील नागरिक दहशतीत आले आहे.

कारेगाव येथील वाघाची शिकार झालेली गाय ही शेतकरी बजरंग मडावी यांच्या मालकीची होती. शिकारीची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी पंचनामा केला. सलग दोन दिवसात दोन जनावरांची शिकार केल्याची माहिती मिळताच वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लाऊन वाघाचा शोध घेणे सुरू केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. जनावरांची वाढत चाललेली शिकार तसेच पिवरडोल येथील युवकाला वाघाने ठार केल्याने गावकरी दहशतीत आले आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.