सावधान…. वागदरा शेतशिवारात वाघोबा…

वागदरा, वसंतनगर परिसरात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी तालुक्यातील बोटोणी जवळच्या वागदरा शेत शिवारात एका शेतक-याला वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे वनपरिक्षेत्र विभागाने या विभागात अलर्ट जाहीर करत परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

बापुजी राम टेकाम यांचे वागदरा परिसरात शेत आहे. आज सकाळी ते शेतात कामासाठी गेले होते. तिथे त्यांना वाघ आढळून आला. त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी तात्काळ शेतशिवारात जाऊन पाहणी केली.

कर्मचा-यांना तिथे वाघ आढळून आला नाही. मात्र तिथे वाघाच्या पायाचे ठसे (पगमार्क) आढळून आले. त्यामुळे वन परिक्षेत्र विभागाने वागदरा, वसंत नगर परिसरात अलर्ट जाहीर करत परिसरातील नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान सराटी गावालगत असलेल्या शेतशिवारात एका गुराख्याला वाघाचे दर्शन झाले. त्याने याबाबत वनविभागाला सूचना दिली. वनविभागाचे कर्मचारी गेले असता तिथे त्यांना वाघाटे पगमार्ग आढळून आले नाही. मात्र तरीही या भागातील नागरिकांनीही सतर्क राहावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही व्ही झाडे यांनी केले आहे.

आस्वलानंतर आता वाघाचे दर्शन
चार महिन्याआधी बोटोणी परिसरातील आवळगाव खैरगाव जंगलात आस्वलाचा मुक्त संचार सुरू होता. अनेकांना आस्वलाने दर्शनही दिले होते. याबाबत वन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला होता. सुदैवाने कोणती दुर्दैवी घटना झाली नव्हती. मात्र आता या भागात वाघानेही दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.