वाघाची दहशत आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

वनविभागाने उपाययोजना करण्याची ग्रामवासीयांची मागणी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडकोली गाव चारही दिशेने जंगलाच्या मधोमध वसलेले आहे. बहुतांश गावकऱ्यांच्या शेती जंगलालगत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर वन्यप्राणी घुसून उभ्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात करीत आहे. ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर गावात व शेत शिवारात वाघाचा मुक्त संचार होत आहे.

शेतकऱ्यांच्या अनेक जनावरांची शिकार वाघाने केली आहे. जंगलात पाणी पिण्याकरिता जंगली प्राण्यांना मिळत नसल्याने गावाजवळ सतत वाघाचे दर्शन होत आहे. गावकऱ्यांसह शेतकरी घाबरलेले असून दहशतीत वावरत आहेत. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात वन्यप्राण्यांचा त्रास व भीतीमुळे शेतकरी व मजुरवर्ग शेतात जाण्यास घाबरत आहे.

शेतातील शेतमाल घरी आणायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे थाटला आहे. तरी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेतून किंवा इतर योजनेतून काटेरी कुंपण किंवा तारेचं कुंपण करून जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उपसंरक्षक अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह वनमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. जनावरांचा बंदोबस्त न केल्यास उपोषणाचा इशारा सरपंचांसह समस्त ग्रामवासीयांनी दिला आहे.

हेदेखील वाचा

दिवसाढवळ्या रेतीची तस्करी करणारे 2 हायवा जप्त

हेदेखील वाचा

दिवसाढवळ्या रेतीची तस्करी करणारे 2 हायवा जप्त

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.