ट्रामा सेंटरमध्ये आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी आमदारांचे पत्र

जिल्हाधिका-यांना पत्र, ट्रामा सेंटरमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यास हालचालींना वेग

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढता मृत्यूदराने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. परसोडा येथील कोविड केअर सेंटर येथील गैरसोयीबाबत रुग्णांच्या चांगल्याच तक्रारी वाढल्यास आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर येथे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहे. दरम्यान प्रधानमंत्री खनिज विकास निधी अंतर्गत वणी येथील ग्रामीण रूग्णालयातील ट्रामा केअर इमारतीमध्ये आक्सिजन, व्हेन्टीलेटर, बेड व डॉक्टर यांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जिल्हाधिका-यांना पत्र दिले आहे.

पत्रात म्हटले आहे की अलिकडे कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 15 दिवसांपासून रोज 30 ते 40 पॉजिटिव्ह रूग्णाची नोंद होत आहे. वणीतील रूग्णांना वणी तालुक्यातील परसोडा येथील कोवीड सेंटरमध्ये पुरेशा प्रमाणात सोयी उपलब्ध नाही. वणीच्या रूग्णांना जि.एम.सी. यवतमाळ येथे बेड उपलब्ध होत नाही. 2 ते 3 तास रूग्णांना ऍम्बुलन्स मध्येच ठेवले जाते.

योग्य आणि वेळीच उपचार मिळत नसल्याने रुग्णांना नागपूर, सेवाग्राम वर्धा, चंद्रपू येथे जातात. पण तिथेही खासगी रूग्णालयात सुध्दा बेडची उपलब्धता होत नाही. गेल्या 6 महिन्यांपासून लोकप्रतिनिधी व प्रशासन आरोग्य कर्मचारी, पोलीस व इतर सर्वच विभाग कोरोनाशी लढा देऊन सुध्दा जनतेची प्रशासनाच्या प्रती प्रचंड नाराजी आहे.

वणी विधानसभा क्षेत्रासाठी प्रधानमंत्री खनिज प्रतिष्ठान निधी प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. पालकमंत्री व आपण निर्णय घेवून या निधीच्या माध्यमातून तातडीने वणी येथील ट्रामा केअर इमारतीमध्ये 50 बेड, आक्सिजन व व्हेन्टीलेटरची व्यवस्था तातडीने निर्माण करणे शक्य आहे. जेणेकरून रूग्णांची हेळसांड होणार नाही व नागरीकांचा रोषही कमी होणार.

 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.