टॉपवर्थ कोळसा कंपनीकडून धान्याच्या किटचे वाटप

आठ गावातील गरजूंना किटचे वाटप

0

सुशील ओझा, झरी: गोरगरीब जनतेकरिता टॉपवर्थ ऊर्जा मेटल्स कंपनी सरसावली असून जिल्हा प्रधासनाच्या मार्गदर्शनाखाली अर्धवन, पांढरकवडा (ल), भेंडाळा, रायपूर, पाटण, खरबडा बिरसाईपेठ व झरी या गावातील गरजू व गरीब लोकांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी तहसीलदार जोशी नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर, मंडळ अधिकारी चांदेकर व निमकर, तलाठी इटनकर, कंपनीचे अरुण वैद्य, सहायक प्रबंधक आनंद नायगावकर, एच आर ऑफिसर राजेश कापणवार, लायजनिंग ऑफिसर बम बम सिंग, मुकेश आसुटकर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले त्यावेळी किट वाटप करण्यात आलेल्या गावातील प्रतिष्ठित व गावकरी उपस्थित होते.

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता लॉकडाऊन करण्यात आले. दीड महिन्याचा कालावधी लोटत असून गोरगरीब जनतेच्या हातातील कामे गेल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. गोरगरीब जनता रोजमजुरी मोलमजुरी करून जगणारी जनतेला आपले कुटुंब जगविणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्याचा टॉपवर्थ कंपनीने निर्णय घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.