बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या मोहदा येथील एका ट्रॅक्टर चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आदुराम सुंदरलाल किलो (अंदाजे 42) असे मृतकाचे नाव आहे. तो परप्रांतिय होता. मोहदा येथे राहायता. तो आधी खडकी गणेशपूर येथे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा. तर काही दिवसांपासून तो मजुरी करीत होता. शुक्रवारी दिनांक 15 मार्च रोजी तो कामाला गेला होता. रात्री तो घरी आला मात्र त्याने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्र संपवली. काही वेळाने शेजा-यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी शिरपूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. आदुराम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. आदुराम यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी सकाळी वणीत एका टेलरिंग व्यवसाय करणा-याने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर रात्री ही घटना उघडकीस आली. एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना घडल्याने आणि सततच्या आत्महत्येने तालुका हादरला आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.