रस्ता जाम अन् वाढलं हे काम

ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे जनतेत प्रचंड संताप

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ते बोरी या मार्गावर नेहमीच होणाऱ्या जाम मुळे जनता त्रस्त झाली आहे. जाममुळे त्यांची काम वाढत आहेत. अडथळे येत आहेत. त्यामुळे जनता प्रचंड संतापली आहे. जाममुळे एक ते दिन किमी अंतरापर्यंत चारचाकी वाहनांची लाईन लागते. वाहन फसल्यामुळे मुकुटबनकडे येणारी व बोरीकडे जाणारी सर्वच वाहने अडून राहतात.

शेतकऱ्यांना बैलगाडी व कापूस आणण्याकरिता लहान वाहन व दुचाकी जाणे कठीण झाले आहे. नागपूर ते पांढरकवडा व्हाया बोरीमार्गे तेलंगणा व आंध्रप्रदेशात नॅशनल हायवे क्रमांक ७ वरून मोठ्या प्रमाणात ट्रक, आयशर व इतर मोठी वाहने धावतात. परंतु हायवेवरून धावणारे अनेक ट्रक व आयशर गेल्या दोन तीन महिन्यापासून बोरी ते दिग्रस वाया आनंतपूरमार्गे तेलंगणात मोठ्या प्रमाणात धावत आहेत.

बोरी ते पाटण रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर रस्त्याचा दोन्ही बाजूला चिखल साचला आहे. या मार्गावर बैलगाडी, दुचाकीसुद्धा चालविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जाणेसुद्धा कठीण झाले आहे. पाटण ते बोरी मार्गावर शासकीस बस व खाजगी गाड्या चालत होत्या. आता ओव्हररलोड वाहतूक होतआहे. या जड वाहतुकीमुळे या मार्गावर अनेकदा जड वाहतुकीचे ट्रक एकमेकांना क्रॉस करून जाण्याच्या नादात फसत आहेत.

पूर्ण वाहतूक ठप्प होऊन चारचाकी गाड्यांची एक एक किलोमीटरची लांब लाईन लागत आहे. दोन दिवसांपूर्वी सुरदापूरजवळ दोन आयशर गाड्या फसल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. या बाबत सुरदापूर गावातील सुज्ञ नागरिक कासावार यांनी पोलीस स्टेशनला कळविले होते. बोरी ते पाटण व्हाया आनंतपूर मार्गावरून ट्रक व आयशर गाड्यांची वाहतूक होत नव्हती.

या वाहतुकीमुळे जनतेच्या मनात शंका व्यक्त केली जात आहे. नॅशनल हायवे सोडून आतील मार्गाने ट्रक व आशयर का जात आहेत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तरी सदर वाहनांची तपासणी करून येणाऱ्या वाहतुकीचा पर्दाफाश करावा आधी मागणी होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.