शिक्षण अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे शिक्षिकेवर ‘अतिरिक्त’ची टांगती तलवार

समायोजनासाठी 50 हजार रूपयांची मागणी केल्याचा आरोप

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे एका शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेला माध्यमिक शिक्षण अधिकारी चिंतामन वंजारी यांनी समायोजनासाठी  50 हजार रूपयांची मागणी केली, पण ती मागणी पूर्ण न केल्याने, शिक्षिकेच्या पतीवर संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी पोलिसात खोटी तक्रार दाखल करुन बदनाम करण्याचं षडयंत्र केल्याचा आरोप शिक्षक दाम्पत्याने पत्रकार परिषद मध्ये केला आहे.

मारेगाव येथील शिक्षिका माधुरी उत्तम कुमरे ह्या शिक्षिकेला सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याने अतिरिक्त ठरविले. त्यामुळे शिक्षिकेच्या पती संजय आत्राम यांनी यावर माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचे कडे जाऊन विचारणा केली, पण शिक्षिकेचे पती हे अंगावर धाऊन आल्याची खोटी तक्रार शिक्षण अधिकाऱ्याने पोलिसात केली. तसंच धाक दाखवित, अनेक वृत्तपत्रातून बदनामी केली असा आरोप आत्राम या शिक्षक दाम्पत्याने केला आहे.

संजय आत्राम एका जि.प. शाळेत कार्यरत आहे. त्यांच्यावर शालेय कामाच्या चौकशीचा ससेमिरा लावला असा आरोप करीत या प्रकरणाने मानसिक दडपनाखाली आल्याची माहिती पत्रकार परिषदेत आत्राम यांनी दिली. आपण पत्नीच्या समायोजनासाठी पैसे नाकारले असल्याने हे कृत्य शिक्षण अधिकारी यांनी केला असाही आरोप शिक्षक दाम्पत्याने पत्रकार परिषद मधे केला आहे.

दरम्यान संस्थेमार्फत सन २०१५-१६ सत्रात डी.एड.,बी.एड. सेवा जेष्ठतेनुसार इंग्रजी व गणित विषय वगळता कनिष्ठ शिक्षकांना अतिरिक्त  ठरविण्यात आले, मात्र आपण पदवीधर असल्याने हा नियम आपल्याला मान्य नसल्याचा आक्षेप सदर शिक्षिकेने शिक्षण अधिकाऱ्या समक्ष नोंदविला.

शासनाच्या परिपत्रकानुसार माझी पत्नीचे दावेदार असल्याने संबंधित अधिकारी केवळ भुलथापा देण्याचा प्रयत्न करीत आहे, आम्ही न्याय मागणी साठी गेलो असता मला शिक्षण अधिकाऱ्यांकडून हाकलून लावण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही शिक्षिकेचे पती संजय आत्राम यांनी वणी बहुगुणी कडे केला अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.