मारेगाव पोलिसांचे पथ संचालन

सण, उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यस्था राखण्याचं आवाहन

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील दुर्गा उत्सव आणि मोहरम हे उत्सव शांततेत पार पडावे यासाठी मारेगाव पोलिसांनी तालुक्यात तीन ठिकाणी पथसंचलन केले. वेगाव, नवरगाव आणि मारेगावात हे पथसंचनल करण्यात आले. ग्रामीण भागात पथसंचलन करण्याची मारेगाव पोलिसांची ही पहिलीच वेळ आहे.  मारेगावचे ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनात हे पथसंचलन करण्यात आले.

सध्या दुर्गोत्सव साजरा केला जात आहे. त्यातच रविवारी मुस्लिम बांधवांचा मोहरम हा सण देखील येत आहे. दोन्ही सण एकाच वेळी आल्यानं अनेक असामाजिक घटक या उत्सवादरम्यान शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी हा उद्देश घेऊन मारेगाव पोलिसांनी पथसंचलन केलं. या पथसंचलनाला दुपारी 12 वाजता वेगावपासून सुरूवात झाली. नंतर नवरगाव इथं पथसंचलन करण्यात आलं. तर शेवटी मारेगावात पथसंचनल करण्यात आलं.

मारेगावात जिजाऊ चौकातून पथसंचलनाला सुरूवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करत या पथसंचलनाचा समारोप स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये झाला. मारेगावचे ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राहुलकुमार राऊत यांचे सह 50 शिपयांचा सहभाग या पथसंचलनात होता.

Leave A Reply

Your email address will not be published.