दुचाकीला वाचविताना ट्रॅव्हल बस शिरली शेतात

मोठा अनर्थ टळला, प्रवासी किरकोळ जखमी

0

जोतिबा पोटे, मारेगाव : वणीवरून यवतमाळकडे प्रवासी घेऊन जात असताना दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्नात इस्सार पेट्रोल पंपाजवळ एम एच 29,एम 8330 क्रमांकाची ट्रॅव्हल्स शेतात शिरली. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी झाली नाही.

Podar School 2025

वणीवरून ट्रॅव्हल्स प्रवासी घेऊन यवतमाळ कडे भरधाव वेगाने जात असताना मारेगावपासून दोन किमी अंतरावर असलेल्या इस्सार पेट्रोल पंप जवळ महामार्गाच्या मधे आलेल्या दुचाकी क्र एम.एच२९,ए.बी.५८७५ या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अपघात टळला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेतात ट्रॅव्हल्स शिरताना शेताच्या बांधावर असलेल्या पाईवरून ब्रेक मारला असता, किव्हा ट्रॅव्हल्स नियंत्रण झाली नसती तर मोठी हानी झाली असती. परंतु या ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करीत असलेले सात प्रवासी जखमी झाले असून ट्रॅव्हलचालक दिनेश खंडारे (३५) प्रवासी ललिता विठ्ठल मडावी (३५),लक्ष्मी गणेश अंबादेवे
(५०), रूपाली सतीश उईके (४०), श्रीकांत विजय गावंडे (३०)़ मुरलीधर लखमापुरे (५८),गीता मुरलीधर लखमापुरे (५२) यांना किरकोळ इजा झाली. त्यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनेचा तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.